UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! पुण्याच्या ‘इंड्युकेअर फार्मा’चा उत्पादन परवाना रद्द; आता MPCB आणि फॅक्टरी लायसन्सही होणार का रद्द?

07 August 2026 WhatsApp वर शेअर करा

उद्योगन्युज डेस्क | पुणे

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मोठी कारवाई करत जेजुरी-पुणे येथील ‘इंड्युकेअर फार्मा प्रा. लि.’ (Inducare Pharma Pvt. Ltd.) या नामांकित आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

कंपनीच्या उत्पादनांमध्ये गंभीर अस्वच्छता, मानक संचालन पद्धतींचे (SOP) उल्लंघन आणि औषधांमध्ये बुरशी व कीटक आढळून आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर औषध निर्मिती क्षेत्रासह औद्योगिक जगतात प्रचंड खळबळ उडाली असून, “आता प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि औद्योगिक सुरक्षा (Factory Licence) विभागही या कंपनीचे परवाने रद्द करणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तपासणीत उघड झालेले गंभीर उल्लंघन:

MNCs व औद्योगिक वर्तुळात उपस्थित होणारे प्रश्न:

एफडीएने परवाना रद्द केल्यानंतर आता इतर नियामक यंत्रणांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे:

  1. MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ): कारखान्यातील जैव-कचरा व अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘संमती परवाना’ (Consent to Operate) रद्द केला जाणार का?
  2. डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ (Factory Licence): कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या अस्वच्छ वातावरणाची दखल घेऊन कारखाना परवाना (Factory Licence) निलंबित किंवा रद्द होणार का?

प्रशासनाचा कडक इशारा:

“नागरिकांच्या आरोग्याशी आणि औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. औषध उत्पादकांनी ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’ (GMP) आणि कायद्याचे काटेकोर पालन केलेच पाहिजे, अन्यथा यापेक्षाही कठोर पावले उचलली जातील,” असा थेट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Udyognews.in वर ताज्या औद्योगिक घडामोडींचे अपडेट्स पाहत राहा.