UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

औद्योगिक क्षेत्रासाठी धोक्याची घंटा: गॅस उपकरणांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई होणार; ‘डिश’ (DISH) पुणे विभागाचा कंपन्यांना इशारा !

18 July 2026 WhatsApp वर शेअर करा
औद्योगिक क्षेत्रासाठी धोक्याची घंटा: गॅस उपकरणांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई होणार; ‘डिश’ (DISH) पुणे विभागाचा कंपन्यांना इशारा !

पुणे / पिंपरी :*
औद्योगिक क्षेत्रात कामगारांची सुरक्षा हा केवळ एक नियम नसून ते सर्वोच्च कर्तव्य आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील ‘शॅफ्लर इंडिया लिमिटेड’ कंपनीत घडलेल्या दुर्दैवी कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीप्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने (DISH) कंपनीविरोधात न्यायालयात दोन खटले दाखल करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या धडक कारवाईची माहिती ‘डिश’ पुणे विभागाच्या उपसंचालक तृप्ती कांबळे मॅडम यांनी दिली. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा दर्जा राखण्यासाठी आणि कामगारांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कांबळे मॅडम आणि त्यांच्या पथकाने घेतलेली ही अत्यंत तत्पर आणि तडजोडहीन भूमिका संपूर्ण औद्योगिक विश्वासाठी मार्गदर्शक आणि कौतुकास्पद ठरत आहे.

नेमकी घटना काय होती?

९ जून रोजी शॅफ्लर इंडिया कंपनीच्या हीट ट्रीटमेंट विभागातील क्वेंचिंग ऑइल टाक्यांसाठीच्या फ्लडिंग सिस्टीमचे देखभाल काम सुरू असताना एका गॅस सिलेंडरची पिन उघडून अचानक मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती झाली. या वायुगळतीमुळे मॅनिफोल्ड खोलीत काम करणारे कंत्राटी कामगार गौरीशंकर शर्मा (वय ३८) आणि वैभव थोरात (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.

तपासात समोर आलेली धक्कादायक निष्पन्नता

घटनेनंतर उपसंचालक तृप्ती कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या सखोल चौकशीत कंपनीच्या व्यवस्थापनामधील अत्यंत गंभीर त्रुटी समोर आल्या:

तृप्ती कांबळे मॅडम यांच्याकडून उद्योगांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

पुढील काळात अशा भीषण दुर्घटना आणि आगीचे धोके टाळण्यासाठी तृप्ती कांबळे मॅडम यांनी सर्व उद्योगांना आणि कारखाना व्यवस्थापनाला सुरक्षा मार्गदर्शकांचे (Safety Guidelines) काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत:
१. सुरक्षित स्थलांतर: कार्बन डायऑक्साइड आणि इतर घातक गॅस सिलेंडर बँक्स नेहमी मोकळ्या आणि हवेशीर ठिकाणीच स्थापित कराव्यात.
२. प्रशिक्षित मनुष्यबळ: गॅस उपकरणांची देखभाल, दुरुस्ती किंवा सिलेंडर बदलण्याचे काम केवळ आणि केवळ प्रमाणित व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनच करून घ्यावे.
३. नियमित ऑडिट व एसओपी (SOP): गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स, व्हॉल्व्ह आणि फ्लडिंग सिस्टीमचे वेळोवेळी सेफ्टी ऑडिट व्हावे. तसेच सुरक्षित हाताळणीची पद्धत (Safe Handling Procedures) प्रत्येक विभागात लावलेली असावी.

संपादकीय मत: ‘डिश’ पुणे विभागाचे पाऊल कौतुकास्पद

औद्योगिक अपघात केवळ जीवितहानी करत नाहीत, तर अनेक कुटुंबांचे छत्र हिरावून घेतात. अशा वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बड्या कंपन्यांवरही कायदेशीर चाकोरीत राहून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे धाडस उपसंचालक तृप्ती कांबळे मॅडम यांनी दाखवले आहे. त्यांचे हे पाऊल औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना सुरक्षिततेची हमी देणारे आणि निष्काळजी व्यवस्थापनाचे डोळे उघडणारे आहे. पुणे विभागाच्या ‘डिश’ (DISH) संचालनालयाने घेतलेल्या या कठोर भूमिकेचे औद्योगिक वर्तुळातून स्वागत होत असून, इतर कंपन्यांनीही यातून धडा घेऊन आपल्या सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने सुधारणे गरजेचे आहे