UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

चाकण MIDC मधील पेट्रोल पंपांवर मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह सुविधा कुठे गायब? हजारो कामगारांचा संताप

22 July 2026 WhatsApp वर शेअर करा

उद्योगन्यूज | चाकण MIDC प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या चाकण MIDC मध्ये दररोज हजारो कामगार, अभियंते, उद्योगपती, पुरवठादार आणि मालवाहतूक चालकांची ये-जा सुरू असते. मात्र अनेक वाहनचालकांकडून अशी तक्रार करण्यात येत आहे की काही पेट्रोल पंपांवर मोफत टायर हवा, मोफत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत किंवा त्यासाठी पैसे आकारले जातात.

भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या Marketing Discipline Guidelines (MDG) नुसार पेट्रोल पंपांवर खालील मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे:

या सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे ही ग्राहक सेवा मानली जाते.

कामगारांचा प्रश्न

चकण MIDC मध्ये हजारो कर्मचारी दररोज दुचाकी व चारचाकीने प्रवास करतात. अशा वेळी:

यामुळे कामगार, महिला कर्मचारी आणि प्रवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे

उद्योगन्यूजच्या माध्यमातून आम्ही खालील मागण्या करत आहोत:

  1. चाकण MIDC परिसरातील सर्व पेट्रोल पंपांची संयुक्त तपासणी करण्यात यावी.
  2. प्रत्येक पेट्रोल पंपावर “मोफत हवा उपलब्ध आहे” असा फलक लावणे बंधनकारक करावे.
  3. २४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
  4. महिला व पुरुषांसाठी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य शौचालये कायम खुली ठेवावीत.
  5. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपांवर संबंधित तेल कंपनी व प्रशासनाने आवश्यक कारवाई करावी.

उद्योगन्यूजचे आवाहन

जर चाकण MIDC परिसरातील कोणत्याही पेट्रोल पंपावर मोफत हवा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध नसतील किंवा त्यासाठी पैसे मागितले जात असतील, तर संबंधित नागरिकांनी फोटो, व्हिडिओ आणि अचूक माहिती UdyogNews.in कडे पाठवावी.udyog.news3@gmail.com वस्तुनिष्ठ पडताळणीनंतर संबंधित बातमी प्रसिद्ध करण्यात येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाईल.

— उद्योगन्यूज टीम | UdyogNews.in