पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
पिंपरी, ता. ८ : उरवडे (ता. मुळशी) येथील MULLER-BBM ACOUSTIC कंपनीकडून होणारे ध्वनी व वायू प्रदूषण तसेच सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या कंपनीमुळे लगतच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उरवडे येथील लवासाच्या रस्त्यालगत असलेल्या ‘फुलर-बीबीएम अकोस्टिक टेक्नॉलॉजी’ या कंपनीकडून सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कंपनीला ‘स्थापना संमती पत्र’ देताना घातलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.
या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक, लहान मुले आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, काहींना श्वसनाचे व कानाचे आजार जडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर मारणे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नियमानुसार रेड कॅटेगरीमधील कंपनी शाळा, रुग्णालय आणि रहिवासी क्षेत्रापासून किमान १०० ते २०० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र, या कंपनीने नियमांचे उल्लंघन करून काम सुरू ठेवले आहे.
कंपनीने ‘सेकंड कन्सेंट’ न घेताच मॅन्युफॅक्चरिंग आणि वेल्डिंगची कामे सुरू केली असून, ही प्रशासनाची फसवणूक असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
त्यामुळे पीएमआरडीए प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन स्थळ पाहणी करावी आणि कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत कंपनीचे मानव संसाधन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासकीय स्तरावर काय पावले उचलली जातात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उरवडे, ता. मुळशी हे क्षेत्र MPCB SRO Pune-IIच्या कार्यक्षेत्रात येते. MPCBच्या अधिकृत माहितीनुसार SRO Pune-IIच्या कार्यक्षेत्रात मुळशीसह खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ आणि शिरूर तालुक्यांचा समावेश आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांनी केलेल्या या गंभीर तक्रारीची MPCB SRO Pune-II यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी, संमतीतील अटींची तपासणी, प्रदूषणाची मोजणी आणि नियमभंग आढळल्यास संबंधित कंपनीवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योगन्यूज.inकडून करण्यात येत आहे.
विशेषतः CTE/CTOच्या अटी, उत्पादन प्रक्रिया, वायू व ध्वनी प्रदूषण, बांधकामाची परवानगी आणि शाळा/रुग्णालय/रहिवासी क्षेत्रापासूनचे अंतर यांची अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे.
एमबाएएम कंपनी उरवडे, Urwade Mulshi pollution, Mulshi industrial pollution, MPCB Pune, MPCB SRO Pune 2, उरवडे प्रदूषण, मुळशी औद्योगिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण पुणे, वायू प्रदूषण पुणे, MPCB action Pune, MPCB complaint, Red Category Industry Pune, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, PMRDA action, Pune industrial news, Mulshi industrial news, Pune pollution news, UdyogNews.in
SEO Meta Title:उरवडेतील एमबाएएम कंपनीवर नियमभंगाचा आरोप; MPCB कारवाई करणार?
Meta Description:उरवडे, मुळशी येथील एमबाएएम कंपनीकडून ध्वनी व वायू प्रदूषण आणि नियमभंगाचा आरोप. स्थानिक नागरिकांची तक्रार; MPCB SRO Pune-II कडून तातडीच्या कारवाईची मागणी.