UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

चाकण-भोसरीत २३२०.९७ कोटींची औद्योगिक झेप!

26 August 2026 WhatsApp वर शेअर करा

४९ MSME उद्योगांसोबत सामंजस्य करार; ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग आणि प्रिसिजन क्षेत्राला मोठी चालना

पुणे | उद्योगन्यूज प्रतिनिधी

चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याच्या भविष्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन आणि ४९ MSME उद्योगांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले असून, या माध्यमातून चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्यात ₹२,३२०.९७ कोटींची प्रस्तावित गुंतवणूक होणार आहे.

या गुंतवणुकीमुळे पुणे जिल्ह्याच्या ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्लस्टरला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री यांनी MSME क्षेत्राला मोठ्या उद्योगांच्या विस्तारासाठी महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले असून, प्रस्तावित उद्योग पुढील एक ते दोन वर्षांत उत्पादन सुरू करण्याच्या दिशेने पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

चाकणमध्ये मोठी गुंतवणूक

चाकण औद्योगिक क्षेत्र – Phase III, GB-2

  1. रीगल इंजिनिअरिंग — ₹28 कोटी
  2. साईराज इंजिनिअरिंग वर्क्स — ₹90 कोटी
  3. साईश्रेयांश इंडस्ट्रीज प्रा. लि. — ₹27 कोटी
  4. संकल्प इंडस्ट्रीज — ₹90 कोटी
  5. प्रगती इंजिनिअरिंग — ₹100 कोटी
  6. अपोजी प्रोजेक्ट LLP — ₹91 कोटी
  7. प्रगती इस्पात उद्योग — ₹95 कोटी
  8. व्हिक्टरी मोल्ड टेक — ₹54 कोटी
  9. इंडियन टूल्स — ₹75 कोटी
  10. जेन्युइन लेझरटेक — ₹87 कोटी
  11. श्री अँड श्री उद्योग — ₹43 कोटी

या उद्योगांमध्ये हँड टूल्स, ऑटोमोबाईल घटक, CNC/VMC मशीनिंग, डाय-मोल्ड, प्रिसिजन पार्ट्स, ऑटोमेशन, फॅब्रिकेटेड मेटल उत्पादने आणि औद्योगिक पायाभूत घटक यांचा समावेश आहे.

GB-3 मध्ये ₹543 कोटींचे प्रस्ताव

चाकण औद्योगिक क्षेत्र – Phase III, GB-3

  1. प्लॅनेटो टूल टेक प्रा. लि. — ₹200 कोटी
  2. श्री साईकृपा एंटरप्रायझेस — ₹70 कोटी
  3. जेन्युइन इंजिनिअरिंग — ₹90 कोटी
  4. आदित्य ऑटोमेशन्स अँड कंट्रोल्स प्रा. लि. — ₹82 कोटी
  5. अयोध्या एंटरप्रायझेस — ₹22 कोटी
  6. प्रवीण इंडस्ट्रीज — ₹53 कोटी
  7. प्रथमेश वेल्डिंग सोल्युशन्स प्रा. लि. — ₹26 कोटी

यापैकी प्लॅनेटो टूल टेकची ₹200 कोटींची गुंतवणूक विशेष लक्षवेधी आहे. प्रेस टूल्स, शीट मेटल्स आणि ऑटोमोबाईल घटकांच्या उत्पादनामुळे चाकणच्या ऑटोमोबाईल सप्लाय चेनला त्याचा फायदा होऊ शकतो.

GB-17/AM-25 मध्ये इंजिनिअरिंग उद्योगांची मोठी साखळी

  1. लक्ष्मी सागर इंजिनिअर्स प्रा. लि. — ₹27 कोटी
  2. युनिव्हर्सल इंजिनिअरिंग — ₹24 कोटी
  3. टेक्नोसिस ऑटोमेशन — ₹27 कोटी
  4. जय गणेश इंडस्ट्रीज — ₹39 कोटी
  5. ग्लोबल CNC मशिनरी — ₹46 कोटी
  6. गुरुदत्ता एंटरप्रायझेस — ₹42 कोटी
  7. अपटेक प्रिसिजन प्रा. लि. — ₹85 कोटी
  8. दलाल मशीन टूल्स एजन्सी प्रा. लि. — ₹28 कोटी
  9. सुमा मशिनरी प्रा. लि. — ₹72 कोटी
  10. आर्ट फॅब्रिकेटर्स — ₹95 कोटी
  11. श्री गजानन महाराज बॉयलर्स LLP — ₹85 कोटी
  12. M B ऑटो फास्टनर्स — ₹54 कोटी
  13. BR इंटरनॅशनल — ₹25 कोटी
  14. ऋतिक इंडस्ट्रीज — ₹48 कोटी
  15. गांधी स्प्रिंग प्रा. लि. — ₹28 कोटी
  16. वालाकी एंटरप्राईज — ₹31.59 कोटी
  17. आदित्यराज स्टील — ₹23.10 कोटी
  18. गेटवे ट्रेडर्स — ₹15 कोटी

या भागातील प्रस्तावांमध्ये CNC मशीनिंग, ऑटोमोटिव्ह प्रेस पार्ट्स, प्रिसिजन जॉबवर्क, बॉयलर पार्ट्स, फास्टनर्स, स्टील उत्पादने, स्प्रिंग्स आणि औद्योगिक हार्डवेअर यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

भोसरी MIDC मध्येही १३ नवीन प्रस्ताव

भोसरी-MIDC EL Block Tower Line

  1. इनफिनिटी इंजिनिअरिंग सोल्युशन — ₹13.56 कोटी
  2. सचिन उद्योग — ₹29.68 कोटी
  3. सुप्रीम इंडस्ट्रीज — ₹17.90 कोटी
  4. संकल्प इंजिनिअरिंग — ₹13.09 कोटी
  5. बीपायोनियर — ₹14.22 कोटी
  6. एस. के. इंजिनिअरिंग — ₹15.52 कोटी
  7. शिव साई इंजिनिअरिंग — ₹12.72 कोटी
  8. आशिष इंजिनिअरिंग — ₹16.81 कोटी
  9. रसिका इंजिनिअर्स — ₹16.01 कोटी
  10. रुद्र इंजिनिअर्स — ₹14.70 कोटी
  11. रेज मशिनर्स टूल्स प्रा. लि. — ₹16.61 कोटी
  12. टेफ्ट प्लास्ट — ₹15.50 कोटी
  13. सिंग सर्व्हिसेस — ₹6.96 कोटी

भोसरीतील प्रस्तावांमध्ये औद्योगिक पायाभूत सुविधा घटक, औद्योगिक घटक, प्लास्टिक आणि प्रिसिजन इंजिनिअरिंगशी संबंधित उद्योगांचा समावेश आहे.

उद्योगन्यूजचे सकारात्मक मत

चाकण-भोसरीबाबत गेल्या काही काळात वाहतूक, रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्या चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर ४९ MSME उद्योगांकडून ₹२,३२०.९७ कोटींच्या नव्या गुंतवणुकीचे प्रस्ताव येणे ही निश्चितच सकारात्मक आणि आशादायी बाब आहे.

गुंतवणूकदारांचा चाकण-भोसरीच्या औद्योगिक क्षमतेवरील विश्वास या करारातून दिसून येतो. विशेषतः ऑटोमोबाईल, CNC, प्रिसिजन इंजिनिअरिंग, टूल्स, मोल्ड्स, ऑटोमेशन आणि औद्योगिक घटकांच्या क्षेत्रातील ही गुंतवणूक चाकणला केवळ मोठ्या कंपन्यांचे उत्पादन केंद्र न ठेवता मजबूत MSME सप्लाय-चेन हब बनवण्याची क्षमता ठेवते.

आता खरी कसोटी MoU ते प्रत्यक्ष उत्पादन या प्रवासाची आहे. जमीन, रस्ते, वाहतूक, वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन आणि प्रशासकीय परवानग्या याबाबत सरकारने जलद निर्णय घेतले, तर या प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर होऊ शकते.

विशेषतः चाकणमधील पायाभूत सुविधांवर सरकारकडून अलीकडे लक्ष दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक आणखी महत्त्वाची ठरते. चाकण MIDC मधील रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे आणि पार्किंगसारख्या प्रश्नांवर कालबद्ध उपाययोजनांची चर्चा सुरू आहे.

उद्योगन्यूजचा स्पष्ट संदेश — चाकण-भोसरीला गुंतवणूक हवीच; पण त्यासोबत दर्जेदार पायाभूत सुविधा, वेगवान प्रशासन आणि उद्योगस्नेही वातावरणही तितकेच आवश्यक आहे. ₹२,३२०.९७ कोटींच्या या प्रस्तावित गुंतवणुकीकडे केवळ आकडा म्हणून न पाहता, पुण्याच्या औद्योगिक भविष्यासाठी मिळालेली एक मोठी संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.

— उद्योगन्यूज.in | उद्योग, गुंतवणूक आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा आवाज