पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
चाकण परिसराची कचराकोंडी फुटली! ♻️
३६.५ एकरांवर उभारणार PMRDAचा मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प
चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
PMRDAकडून चाकण परिसरासाठी मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची योजना समोर आली आहे.
या प्रकल्पासाठी ३६.५० एकर जागा चाकण एमआयडीसीतील पॉईंट क्रमांक ४ येथे निश्चित करण्यात आली आहे.
▪️ १९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प
▪️ ३६.५० एकर जागा चाकण एमआयडीसीतील पॉईंट क्रमांक ४ येथे निश्चित
▪️ एमआयडीसी देणार जागा; PMRDA उभारणार प्रकल्प
▪️ पुढील ३० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून प्रकल्पाची क्षमता निश्चित केली जाणार
▪️ संबंधित ग्रामपंचायतींना १०० टक्के कचरा वर्गीकरण करून प्रकल्पापर्यंत कचरा पोहोचवावा लागणार
▪️ कचरा वाहतुकीसाठी १५वा वित्त आयोग, स्थानिक व CSR निधीतून वाहनांची व्यवस्था केली जाणार
▪️ निधीअभावी वाहन खरेदी शक्य नसलेल्या ग्रामपंचायतींना CSRमधून सहकार्याची ग्वाही
📍 चाकण, राजगुरुनगर नगरपरिषदेसह परिसरातील १७ ग्रामपंचायतींचा या व्यवस्थेत समावेश होणार आहे.
प्रकल्पासाठी ३६.५० एकर जागा निश्चित झाली, एमआयडीसी जागा देणार आणि PMRDA प्रकल्प उभारणार—मग प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्याची अधिकृत टाइमलाइन काय आहे?
भूमिपूजन कधी?
निविदा कधी?
कामाची सुरुवात कधी?
आणि प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित कधी होणार?
की चाकणच्या कचरा प्रश्नाप्रमाणे हा प्रकल्पही केवळ कागदावरच राहणार?
चाकण औद्योगिक परिसरात MIDCने एका खासगी Hazardous Waste-to-CNG प्रकल्पासाठी जमीन वाटप केल्याची माहिती आहे. मात्र संबंधित प्रकल्प अद्याप कार्यान्वित झालेला नाही.
त्यामुळे नव्या घनकचरा प्रकल्पाबाबतही चाकणकर आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वाभाविक प्रश्न उपस्थित होत आहे—
“जमीन निश्चित झाली म्हणजे प्रकल्प झाला का? की प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्यासाठी अजून कित्येक वर्षे वाट पाहावी लागणार?”
PMRDAने या प्रकल्पाची अंमलबजावणीची स्पष्ट टाइमलाइन, निधीची तरतूद, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कार्यान्वयनाची संभाव्य तारीख जाहीर करणे गरजेचे आहे.
चाकणच्या कचरा प्रश्नाला आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.
— UdyogNews.in