पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) हद्दीतील इमारती मोडकळीस आल्या असून त्यांचा पुनर्विकासासाठी ‘सीडीसीपीआर’मध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार सीडीसीपीआर २०२३ मध्ये बदल करण्यात येणार आहे. या बदलामुळे इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) उपलब्ध होणार असल्याने या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.